अभिनेत्री श्रद्धा कपूरने शेअर केले पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमधील खास फोटो; चाहत्यांना म्हणाली...

Rakesh Mali

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा हंगाम सुरू आहे. गेल्या वर्षी परिणीती चोप्रा, कियारा अडवाणी यांचे लग्न झाले होते, नुकतेच आमिर खानच्या लेकीचेही लग्न पार पडले. आता यात श्रद्धा कपूरचेही नाव जोडले जात आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.
श्रद्धा कपूर अनेकदा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. तर, कधीकधी ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा विषय बनते. आता नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, त्या फोटोंनी दिलेल्या कॅप्शनमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
श्रद्धाने पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केले असून यावर "अच्छी लग रही हूं, शादी कर लूं?" असे कॅप्शन दिले आहे. यावर काही चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका चाहत्याने तर, "आपको देखके दिन बन जाता है. कशी ग तू इतकी गोड", असे म्हटले आहे. तर काहींनी कोणाशी लग्न करणार आहे, असा सवाल केला आहे.