नवरात्रीचा तिसरा दिवस अन् श्वेता शिंदेचा लाल पैठणीत खास साज; मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Mayuri Gawade

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी श्वेता तिच्या पारंपरिक मराठमोळ्या पेहरावामुळेही लक्ष वेधून घेत असते.
शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगाला विशेष महत्त्व असून, याच निमित्ताने श्वेताने लाल इरकल पैठणी साडीतील खास फोटोशूट केलं आहे.
लाल रंगाच्या इरकल पैठणीला असलेला काळा आणि सोनेरी काठ श्वेताच्या पारंपरिक लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
या खास फोटोशूटमध्ये श्वेताने पारंपरिक नथ, सोन्याचे दागिने आणि लाल-हिरव्या बांगड्या परिधान करून आपला मराठमोळा साज पूर्ण केला आहे.
केसांचा सुंदर अंबाडा, त्यात माळलेली लाल फुलं आणि आकर्षक मेकअपमुळे लाल पैठणीतील श्वेताचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
पारंपरिक दागिने आणि लाल पैठणीमध्ये श्वेताने दिलेल्या वेगवेगळ्या पोझ तिच्या या खास नवरात्री फोटोशूटचं आकर्षण ठरत आहेत.
श्वेताने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या असून, तिचा मराठमोळा अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
सर्व फोटो : श्वेता शिंदे/इंस्टाग्राम