अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच, सोनालीच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

Swapnil S

स्वप्नसुंदरी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केले फोटोशुट
सोनाली कुलकर्णीचे फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, सोनालीने पांढऱ्या रंगाची पैठणी साडीवरचे फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केले
सोनाली लवकरच‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनाली छत्रपती ताराराणी यांच्या भुमिकेत दिसणार आहे.
अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी तिच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोनालीने पांढऱ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
पांढऱ्या पैठणी साडीवर सोनाली खूपच सुंदर दिसत आहे. सोनाली या साडीवर मोजके दगिने घातले होते.
सोनालीने फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना येणाऱ्या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. २२ मार्च २०२४ साठी सज्ज असल्याचे सोनालीने यावेळी सांगितले.