Adah Sharma : अदा शर्माची गुलाबी ड्रेसमध्ये दिलखेच 'अदा'

नेहा जाधव - तांबे

अभिनेत्री अदा शर्मा हिने हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. | (Photo - adah_ki_adah)
१९२० या हिंदी चित्रपटापासून 'द केरला' स्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून ती लोकप्रिय झाली. | (Photo - adah_ki_adah)
तिचा केवळ अभिनयच नाही तर तिचे सौंदर्य प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडते. | (Photo - adah_ki_adah)
तिच्या सौंदर्यासोबतच ती एक बहुगुणी अभिनेत्री आहे. अदाला कथक, जॅझ, बॅले, साल्सा आणि बेल्ली असे विविध नृत्यप्रकार येतात. | (Photo - adah_ki_adah)
दक्षिण अभिनेत्री असूनही अदा सुंदर मराठी बोलते. ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे मराठी कवितांचे व्हिडिओही पोस्ट करते. | (Photo - adah_ki_adah)
अदा शर्माने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे, ज्यावर हलकीशी एम्ब्रॉयडरी (भरतकाम) करण्यात आलेली आहे. हा रंग तिच्यावर खूपच उठून दिसत आहे. | (Photo - adah_ki_adah)
अदा शर्माने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याचसोबत तिचं सौंदर्य आणि फॅशन सेन्सही चाहत्यांना खूप आवडतं. | (Photo - adah_ki_adah)