अधिक मासात आवर्जून केले जातात 'हे' स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ
किशोरी घायवट-उबाळे
गोड पुरण आणि तुपाची चवअसलेली पुरणपोळी अधिक मासात नैवेद्यासाठी खास बनवली जाते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
उपवासासाठी हलकी, पौष्टिक आणि चवदार अशी साबुदाण्याची खिचडी अनेक घरांत केली जाते.
राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेले हे थालीपीठ उपवासात आरोग्यदायी मानले जाते.
दुधी भोपळ्यापासून तयार होणारा हलवा गोड पदार्थांमध्ये अधिक मासात आवडीने खाल्ला जातो.
शेंगदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणाचे कुरकुरीत वडे उपवासात खास बनवले जातात.
केशर आणि वेलचीच्या स्वादाचे श्रीखंड पुरीसोबत अधिक मासातील सणावारी जेवणात दिले जाते.
मखाणे, दूध आणि सुका मेवा वापरून बनवलेली खीर उपवासासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट पर्याय आहे.