Aetashaa Sansgiri Photos : अभिनेत्री एतशा संझगिरीचा पैठणीतील सुंदर पारंपरिक लूक; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

किशोरी घायवट-उबाळे

'तुझ्या सोबतीने' फेम अभिनेत्री एतशा संझगिरी सध्या तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.
एतशाने सोशल मीडियावर पैठणी साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
हिरवा काठ असलेल्या निळ्या रंगाच्या या सुंदर पैठणीने तिच्या लूकला खास पारंपरिक टच दिला आहे.
विशेष म्हणजे, ही पैठणी एतशाच्या आईची आहे. या साडीवर तिने मोत्यांच्या दागिन्यांची निवड करत आपल्या लूकमध्ये नजाकत आणली आहे.
गळ्यातील मोत्यांचे तीन नाजूक नेकलेस, हातातील मोत्यांचे कडे आणि छोटीशी नथ तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
कपाळावरील छोटी निळी टिकली, केसांचा अंबाडा आणि त्यात माळलेली फुले यांमुळे एतशाचा पारंपरिक लूक अधिक खुलून दिसत आहे.
हे फोटो शेअर करत एतशाने, "Sorry, but this Paithani deserves all the attention. 💅🏻💚 One more from my mother’s saree collection," असे कॅप्शन दिले आहे.
एतशाच्या या सुंदर लूकवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले असून, तिच्या फोटोंवर कौतुकाच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.