प्रदूषित हवेमुळे खोकला, घशात खवखव होतेय? स्वतःच्या बचावासाठी करा 'हे' ४ उपाय

Mayuri Gawade

सध्या अनेक ठिकाणी वाहनांचा धूर, बांधकामांची धूळ आणि कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित वायूंमुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. अशा वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रदूषित हवेमुळे डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, खोकला आणि शिंका येणे अशा समस्या जाणवू शकतात. विशेषतः दमा, ॲलर्जी किंवा श्वसनाचे विकार असणाऱ्यांना अधिक त्रास होऊ शकतो.
हवेतील प्रदूषणाचे प्रमाण जास्त असेल, तर विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी.
प्रदूषण जास्त असताना सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर फिरायला जाणे, धावणे आणि व्यायाम करणे टाळा. घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या परिसरातील हवेची गुणवत्ता तपासा.
धूर आणि धुळीपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना योग्य प्रकारचा एन९५ मास्क वापरा. हा मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बसणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बाहेर धूर किंवा धुळीचे प्रमाण जास्त असल्यास घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. विशेषतः मुख्य रस्त्यालगत राहणाऱ्यांनी वाहनांचा धूर घरात येणार नाही, याची काळजी घ्यावी.
घरातील हवा स्वच्छ राहण्यासाठी योग्य वेळी खिडक्या उघडून हवा खेळती ठेवा. मात्र, बाहेर प्रदूषण जास्त असताना खिडक्या उघडणे टाळा आणि स्वयंपाकघरातील धूर बाहेर जाण्याची योग्य व्यवस्था करा.
घरातील फरशी, खिडक्या आणि फर्निचरवर साचलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा. कोरड्या झाडूने साफसफाई केल्यास धूळ पुन्हा हवेत उडू शकते.
घरात सतत अगरबत्ती, धूप, मच्छर कॉइल किंवा सुगंधी मेणबत्त्या जाळणे टाळा. यांमधूनही धूर आणि सूक्ष्म कण निर्माण होतात. प्रदूषण वाढल्यास मास्क, स्वच्छता आणि योग्य वायुवीजन यांसारख्या छोट्या सवयींची मदत होऊ शकते. | all photos : ai generated