Aishwarya Rai Birthday : फक्त बॉलिवूड नाही, हॉलिवूडवरही अधिराज्य; ब्युटीक्वीन ऐश्वर्याचे हॉलीवूड हिट्स
Mayuri Gawade
बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन आज (१ नोव्हेंबर २०२५) आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
| छायाचित्र : इंस्टाग्राम (Aishwarya Rai Bachchan)
१९९४ मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकून ऐश्वर्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
| छायाचित्र : इंस्टाग्राम (Aishwarya Rai Bachchan)
“हम दिल दे चुके सनम” आणि “देवदास” सारख्या चित्रपटांनी तिला हिंदी चित्रपटसृष्टीत अव्वल स्थान मिळवून दिलं.
| छायाचित्र : रेडिट
तिचं देखणं रूप, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व आणि अभिनयाची परिपक्वता ह्यामुळे ती आजही लाखोंच्या मनावर राज्य करते.
| छायाचित्र : इंस्टाग्राम (Aishwarya Rai Bachchan)
फक्त बॉलिवूडपुरती मर्यादित न राहता, ऐश्वर्याने हॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि तिथे तिने केलेले काही चित्रपट तर खूपच चर्चेत राहिले.
| छायाचित्र : इंस्टाग्राम (Aishwarya Rai Bachchan)
२००४ मध्ये ऐश्वर्याने ‘Bride & Prejudice’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, जो Jane Austen यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित होता.
| छायाचित्र : विकिपीडिया
त्यानंतर तिने ‘The Mistress of Spices’ (२००५) मध्ये तिलो ही भूमिका साकारली. या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली.
| छायाचित्र : विकिपीडिया
२००६ मध्ये आलेल्या ‘Provoked’ मध्ये तिच्या दमदार अभिनयाने घरगुती हिंसाचाराविरुद्धची कहाणी जिवंत केली.
| छायाचित्र : विकिपीडिया
‘The Last Legion’ (२००७) मध्ये ऐश्वर्याने तलवारीसह अॅक्शन अवतार दाखवत हॉलिवूडमध्ये वेगळं रूप साकारलं.
| छायाचित्र : रेडिट
तर ‘The Pink Panther 2’ (२००९) मधील तिची आकर्षक भूमिका आणि आत्मविश्वासपूर्ण उपस्थितीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चाहत्यांची मनं जिंकली. | छायाचित्र : विकिपीडिया