मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधरच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नुकतेच अक्षयाने तिच्या 'भरजरी' या साड्यांच्या ब्रँडसाठी खास फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये तिने सोनेरी रंगाची चांदीची जर असलेली हातमागावरील टिश्यू बनारसी साडी नेसली आहे.
साडीवरील नाजूक नक्षीकाम आणि सुंदर काठामुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत आहे.
या पारंपरिक लूकसोबत अक्षयाने मोत्यांची ठुशी, कानातले, नथ, मंगळसूत्र आणि बांगड्या असा मराठमोळा साज केला आहे.
तिच्या नथीने आणि मोत्यांच्या दागिन्यांनी या लूकला खास पारंपरिक टच दिला आहे.
अभिनयाबरोबरच अक्षयाने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकले असून, पुण्यातील एफसी रोड परिसरात तिने मैत्रीण निधी आणि माधुरीसोबत २०२४ मध्ये 'भरजरी' हे साड्यांचे दालन सुरू केले.
पैठणी, हातमागावरील साड्या, सिल्क आणि लग्नसराईसह सण-समारंभांसाठी खास डिझायनर साड्यांचे विविध कलेक्शन यामध्ये उपलब्ध आहे.
हिरवा चुडा, मोत्यांचे दागिने, सुंदर साडी आणि लाल ब्लाऊज असा पारंपरिक साज अक्षयाने केला आहे. त्यात मोकळे केस आणि उठावदार मेकअप यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच खुलून दिसत आहे.