Akshaya Gurav : हिरवी साडी, नथ अन् नाजूक दागिने; अक्षया गुरवचा पारंपरिक लूक एकदा पाहाच
किशोरी घायवट-उबाळे
झी युवा वाहिनीवरील ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया गुरव सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
‘मृत्युचक्र’ या तिच्या नव्या थ्रिलर चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अभिनयासोबतच अक्षया सोशल मीडियावरही सक्रिय असून, ती चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते.
नुकतेच अक्षयाने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
या धार्मिक भेटीचे खास फोटो तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अक्षया हिरव्या रंगाच्या पारंपरिक साडीत दिसत असून, लाल-पिवळ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी ब्लाऊजने तिच्या लूकला खास उठाव दिला आहे.
नाजूक चोकर हार, पारंपरिक नथ, कपाळावरील टिकली आणि मोकळे केस यांमुळे तिचा साधा, पण सुंदर पारंपरिक लूक अधिक खुलून दिसत आहे.
‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘मानसीचा चित्रकार तो’ आणि ‘मेहंदीच्या पानावर’ यांसारख्या मालिकांमधूनही अक्षयाने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.