Akshaya Hindalkar Photos : लाल नऊवारीत अक्षया हिंदळकरचा मराठमोळा साज; नथ अन् ठुशीने वेधलं लक्ष

किशोरी घायवट-उबाळे

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया हिंदळकर आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि हटके फॅशन स्टाइलमुळेही नेहमी चर्चेत असते.
नुकतेच अक्षयाने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले असून, तिच्या या मराठमोळ्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोशूटसाठी अक्षयाने गडद लाल रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसली असून, त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
साडीच्या काठावरील सोनेरी आणि जांभळ्या रंगाची आकर्षक नक्षी तिच्या लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
या पारंपरिक लूकला चारचाँद लावले आहेत ते तिच्या दागिन्यांनी! गळ्यात ठुशी, पारंपरिक नेकलेस आणि नाकात सुंदर नथ असा तिचा साज पाहण्यासारखा आहे.
कपाळावरील छोटीशी लाल टिकली, मोकळे सोडलेले केस आणि नजरेतील आत्मविश्वास यामुळे अक्षयाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
हातात पारंपरिक समईसारखी वस्तू घेतलेले तिचे हे फोटो सणासुदीच्या वातावरणाला साजेसे असून, तिचा अस्सल मराठमोळा अंदाज लक्षवेधी ठरत आहे.
अक्षयाने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या सुंदर लूकवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.