Alia Bhatt : काळ्या-सोनरी डिझायनर ड्रेसमध्ये आलियाचा ग्लॅमरस अंदाज; 'अर्थशॉट प्राईज' सोहळ्यातील फोटो एकदा पाहाच
किशोरी घायवट-उबाळे
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मुंबईत पार पडलेल्या 'द अर्थशॉट प्राईज २०२६' या जागतिक पर्यावरण पुरस्कार सोहळ्यात खास उपस्थिती लावली.
१७ नोव्हेंबर रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात आलियाच्या शाही लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पारंपरिक सोनेरी कानातले आणि बाजूबंद यामुळे तिच्या लूकला खास राजेशाही अंदाज आला होता.
आलियाने या सोहळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या चाहत्यांकडून या फोटोंना पसंती मिळत आहे.
या खास कार्यक्रमासाठी आलियाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर रितू कुमार यांनी डिझाइन केलेला काळ्या आणि सोनेरी रंगाचा भरजरी पोशाख परिधान केला होता.
या जागतिक पर्यावरण पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टने पाच प्रमुख अर्थशॉट पुरस्कारांपैकी एका पुरस्काराचे वितरणही केले.
या फोटोंना तिने 'Where Every Story Has A Purpose' असे अर्थपूर्ण कॅप्शन दिले आहे.
प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्यासह ऑस्कर विजेता अभिनेता रामी मालेक, सचिन तेंडुलकर, सोनम कपूर, रकुल प्रीत सिंग, भूमी पेडणेकर आणि शायना एन. सी. यांसारख्या अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण जोहरने केले.
ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेला ‘द अर्थशॉट प्राईज’ सोहळा पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे आलियाची उपस्थिती आणि तिचा पारंपरिक अंदाज विशेष चर्चेत राहिला.