आलिया-रणबीरची लाडकी राहा झाली ४ वर्षांची! अभिनेत्रीने शेअर केले वाढदिवसाचे गोड क्षण; पाहा खास फोटो
Mayuri Gawade
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लाडकी लेक राहा हिचा ६ नोव्हेंबर रोजी चौथा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
रणबीर कपूर आपल्या लाडक्या लेकीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही आणि दोघांचे असे गोड फोटो नेहमीच लक्ष वेधून घेतात.
राहाच्या वाढदिवसाचे खास फोटो आलियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले असून एका फोटोमध्ये आलिया आणि रणबीर लेकीसोबत केक कापताना दिसत आहेत.
राखाडी रंगाचा गोंडस फ्रॉक घालून बागेत मनसोक्त धावणाऱ्या छोट्या राहाचा फोटोही आलियाने शेअर केला आहे.
राहाच्या वाढदिवसासाठी तिच्या आवडत्या कार्टूनच्या थीमवर सुंदर केक तयार करण्यात आले होते.
वाढदिवसाच्या दिवशी छोटी राहा रंगीबेरंगी इंद्रधनुष्याच्या चित्रात रंग भरताना दिसत असून तिचा हा गोड क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
लेकीच्या वाढदिवसाच्या सुंदर सजावटीसमोर आलियानेही आनंदात पोझ दिली असून फोटो शेअर करताना तिने 'She's 4' असं कॅप्शन दिलं आहे.
एका फोटोमध्ये आलिया आपल्या लाडक्या राहाला प्रेमाने किस करताना दिसत असून तिने यावेळीही लेकीचा चेहरा कॅमेऱ्यापासून लपवला आहे.
आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती, तर त्याच वर्षी ६ नोव्हेंबरला राहाच्या जन्माने त्यांच्या आयुष्यात आनंदाची भर पडली. | All Photos : Instagram