आलियाचा साडीतील स्टनिंग लूक!

Swapnil S

आलिया भट्ट ही एक हिंदी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ ला प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने 'टू स्टेट', 'शानदार', 'हायवे', 'हम्पटी शर्मा कि दुल्हनिया', 'कपुर ॲंन्ड सन्स',या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे.
आलिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी स्वतःचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने साडी घातली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.