कोरफडीच्या जास्त वापराने फायद्याऐवजी होते नुकसान; त्वचा अन् आरोग्यासाठी ठरते घातक!

Swapnil S

त्वचेचे होते नुकसान , पिंपल्सवर लावू नये : चेहऱ्यावर खूप डाग व पिंपल्स असतील तर चुकूनही कोरफडीचा गर जास्त लावू नये. यामुळे चेहऱ्यावर खाज आणि ॲलर्जी होऊ शकते. | PM
डिहायड्रेशन : उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या देखील जीवघेणी ठरू शकते. त्यामुळेच या ऋतूत अधिकाधिक पाणी आणि ज्यूस पिण्याचा आणि रसदार फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या ऋतूत कोरफडीचे सेवन हानिकारक असते. .
तेलकट त्वचा : काही लोकांची त्वचा तेलकट असते. अशा त्वचेला कोरफडीचे जेल सूट होत नाही. अशा स्थितीत हे जेल लावल्याने खाज येणे आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कोरफडीच्या गराचा वापर करा. | PM
पोटाच्या समस्या : कोरफडीच्या पानांमध्ये लेटेक्स असते, त्याचे अतिसेवन केल्यास पोटात त्रास होऊ शकतो. काही वेळा पोटात जळजळ, वेदना होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरफडीच्या गराचे सेवन करू नये.