वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनिअम फॉईलचा गोळा टाकतात... पण का? जाणून घ्या भन्नाट फायदे

Mayuri Gawade

कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनिअम फॉईलचा गोळा टाकण्याचा हॅक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा उपाय करण्यासाठी फक्त ॲल्युमिनिअम फॉईलची शीट चुरगळून टेनिस बॉलच्या आकाराचा घट्ट गोळा तयार करा आणि कपड्यांसोबत मशीनमध्ये टाका.v
कपडे धुताना किंवा ड्रायरमध्ये फिरताना तयार होणारा स्टॅटिक चार्ज कमी करण्यास ॲल्युमिनिअम फॉईल मदत करू शकते.
स्टॅटिक चार्ज कमी झाल्यामुळे कपडे एकमेकांत गुंतत नाहीत आणि धुतल्यानंतर प्रत्येक कपडा सहज वेगळा करता येतो.
या ट्रिकमुळे कपड्यांवर धूळ, केस किंवा बारीक तंतू चिकटण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते, त्यामुळे कपडे अधिक स्वच्छ दिसतात.
हा उपाय वॉशिंग मशीनपेक्षा क्लोथ्स ड्रायरमध्ये अधिक प्रभावी मानला जातो, कारण ड्रायरमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जास्त तयार होते.
ड्रममध्ये फिरणारे फॉईलचे गोळे कपड्यांमध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे कपडे अधिक मऊ आणि कमी कडक वाटतात.
फॉईलचे गोळे घट्ट आणि गुळगुळीत बनवा. ते फाटले नसतील तर १५ दिवसांपासून महिनाभर पुन्हा वापरता येऊ शकतात.
नाजूक, एम्ब्रॉयडरी किंवा वर्क असलेले कपडे धुताना हा उपाय टाळा आणि कोणत्याही नवीन हॅकचा वापर करण्यापूर्वी काळजी घेणे नेहमीच महत्त्वाचे आहे. | All Photos : Ai Generated