लंडनमध्ये अमृता देशमुख-प्रसाद जवादेची भटकंती; कधी रोमँटिक तर कधी मस्तीच्या मूडमध्ये दिसली जोडी, पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे. ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांसोबत आपल्या आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते.
नुकतीच अमृता आणि प्रसाद यांनी लंडनला भेट दिली असून, तेथील काही खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमधून दोघांची लंडनमधील धमाल आणि एकमेकांसोबत घालवलेला सुंदर वेळ पाहायला मिळत आहे.
या खास सफरीसाठी अमृताने डेनिम वन-पीस ड्रेससोबत जॅकेट परिधान केले आहे. तिचा हा कॅज्युअल लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
तर प्रसाद काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि लाल जॅकेट अशा हटके लूकमध्ये दिसत आहे.
या फोटोंना अमृताने मजेशीर कॅप्शनही दिले आहे. "माझी लंडन स्टोरी तिच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होती… शेवटचा फोटो अजिबात विसरता येत नाहीये," असे तिने म्हटले आहे.
अमृता तिच्या यूट्यूब व्लॉग्समधून प्रवास, सणांचे सेलिब्रेशन आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. अमृता आणि प्रसाद दोघेही नाटक, मालिका आणि सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात या दोघांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद विवाहबंधनात अडकले.