राखाडी पैठणी अन् मोत्याची ज्वेलरी; पाहा अमृता देशमुखचे खास फोटो

किशोरी घायवट-उबाळे

अमृता देशमुखचा पैठणीतील सुंदर आणि पारंपरिक लूक सध्या चर्चेत आहे.
राखाडी रंगाच्या पैठणी साडीत अमृता कमालीची खुलून दिसतेय.
पैठणीच्या नजाकतीला अमृताच्या सौंदर्याची खास साथ लाभली आहे.
बॅकलेस ब्लाऊजने तिच्या पारंपरिक लूकला मॉडर्न टच दिला आहे.
साडीच्या रंगसंगतीमुळे अमृताचा लूक अधिकच उठून दिसतोय.
साधेपणा आणि स्टायलिश अंदाजाचा सुंदर मेळ अमृताच्या लूकमध्ये पाहायला मिळतोय.
निसर्गरम्य वातावरणात अमृताने दिलेल्या दिलखेचक पोझेस लक्ष वेधून घेत आहेत.
मोत्याच्या दागिन्यांनी तिच्या ट्रेडिशनल लूकची शोभा वाढवली आहे.
गळ्यातील मोत्याचा नेकलेस या लूकचे खास आकर्षण ठरत आहे.
अमृताचा हा पारंपरिक आणि मोहक अंदाज चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.