सातासमुद्रापार मराठमोळ्या लावणीवर अमृता खानविलकरने धरला ठेका

Krantee V. Kale

अभिनेत्री अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लावणीची एक अत्यंत सुंदर आणि दमदार सादरकर्ती म्हणून ओळखली जाते. | (Photo - Insta/amrutakhanvilkar)
स्टेज परफॉर्मन्स, अवॉर्ड शो आणि रिअ‍ॅलिटी शोमधील तिची लावणी सादरीकरणं नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतात. | (Photo - Insta/amrutakhanvilkar)
अमृता हिने नुकताच अमेरिकेत मराठमोळ्या लावणीचा भव्य कलाआविष्कार सादर केला. तिच्या मोहक सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली | (Photo - Insta/amrutakhanvilkar)
‘सुंदरी: द हिस्ट्री ऑफ लावणी (अदा, ताल, श्रृंगार)’ हा दिमाखदार आणि देखणा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच अमेरिकेत शिकागो येथे संपन्न झाला. | (Photo - Insta/amrutakhanvilkar)
‘लावणी किंग’ म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. | (Photo - Insta/amrutakhanvilkar)
त्यांच्या कल्पक दिग्दर्शनामुळे लावणीचं परंपरागत सौंदर्य आणि आधुनिक सादरीकरण यांचा अनोखा संगम प्रेक्षकांना अनुभवता आला.
या वेळी अमृता खानविलकरची मोहक अदा, नजाकत आणि आत्मविश्वासाने सजलेले सादरीकरण पाहायला मिळाले.
तालसौंदर्य उलगडत रसिकांसमोर झालेले हे सादरीकरण पाहून अमृताने केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. | (Photo - Insta/amrutakhanvilkar)