गुलाबी साडी, कुंदन चोकर अन् मनमोहक हास्य; अमृता खानविलकरचे फोटो एकदा पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

गुलाबी साडीतील अमृताचा शाही अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
पारंपरिक साडीला ग्लॅमरस टच देत अमृताने आपला लूक खास बनवला आहे.
या लूकसोबत तिने गळ्यात सुंदर कुंदन आणि मोत्यांचा चोकर परिधान केला आहे.
नाजूक सोनेरी बॉर्डर आणि आकर्षक पदरामुळे साडीला आणखी सुंदर लूक मिळाला आहे.
कानातले, अंगठी आणि हातातील बांगड्यांनी तिचा पारंपरिक साज खुलून दिसतोय.
मेकअपसोबत गुलाबी लिपस्टिकने तिच्या लूकमध्ये ग्लॅमरस अंदाजाची भर घातली आहे. अमृताचा हा ट्रेडिशनल लूक पाहून चाहतेही तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत.
कपाळावरील गुलाबी चंद्रकोर, केसांत माळलेला गुलाब आणि साडीच्या रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन विशेष भावतंय.
कॅमेऱ्यासमोर अमृताने दिलेल्या विविध पोझमुळे फोटोशूटला राजेशाही अंदाज आला आहे.