'साडी' गाण्यातून चर्चेत आलेल्या अंजली आनंदचा मोहक अंदाज; पाहा सुंदर फोटो

किशोरी घायवट-उबाळे

'गुलाबी साडी'च्या हिंदी व्हर्जनमुळे अभिनेत्री अंजली आनंद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या गुलाबी साडीतील लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
'साडी' गाण्याच्या प्रीमियरला अंजलीने आकर्षक गुलाबी साडी परिधान केली होती. तिच्या पारंपरिक आणि एलिगंट स्टाइलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अंजलीने आज बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'कुल्फी कुमार बाजेवाला', 'डब्बा कार्टेल' आणि 'रात जवान है' यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
करण जोहर यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातून अंजलीने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. या चित्रपटात तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
अंजली आता 'धमाल ४' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील 'साडी' आणि 'चटणी' या गाण्यांमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
स्टाइल, आत्मविश्वास आणि दमदार अभिनयाच्या जोरावर अंजली आनंदने मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे नवे फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत.