Ankita Lokhande Photos : ऑर्गेन्झा साडी, डायमंड ज्वेलरी अन् चेहऱ्यावर हास्य; अंकिताचा दसरा स्पेशल लूक एकदा पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री अंकिता लोखंडेने दसऱ्यानिमित्त पती विकी जैनसोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अंकिता आणि विकी यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
दसऱ्याच्या खास निमित्ताने अंकिताने ऑर्गेन्झा साडी नेसली आहे.
या साडीवरील तिचा पारंपरिक आणि एलिगंट लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
लूकला खास टच देण्यासाठी अंकिताने गळ्यात सिल्व्हर डायमंड नेकलेस आणि कानात आकर्षक कानातले घातले आहेत.
बोटातील अंगठीमुळे तिच्या लूकमध्ये आणखी नजाकत आली आहे.
हे फोटो शेअर करत अंकिताने सत्य, चांगुलपणा आणि प्रेमाचा नेहमी विजय होतो, असा सकारात्मक संदेश दिला आहे.
तिच्या या सुंदर लूकसह दसऱ्याच्या खास पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.