अंकिता लोखंडेचा मराठमोळा लूक चर्चेत; पांढऱ्या नऊवारीतील फोटो व्हायरल
किशोरी घायवट-उबाळे
अंकिता लोखंडेने नुकतेच खास फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोशूटसाठी अंकिताने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची, जरीची किनार असलेली सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.
नऊवारी साडीच्या या पारंपरिक लूकमध्ये अंकिताचा मराठमोळा अंदाज विशेष खुलून दिसत आहे.
नाकातील नाजूक पारंपरिक मोत्याची नथ आणि कपाळावरील लाल टिकली तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
गळ्यात ठुशी आणि कोल्हापुरी साज, तर कानात झुमके आणि बुगडी घालून तिने दागिन्यांची खास सांगड घातली आहे.
कमरेला सोनेरी कंबरपट्टा आणि हातात हिरव्या-सोनरी बांगड्या घालून अंकिताने लूकला पारंपरिक टच दिला आहे.
नऊवारीतील मनमोहक अदांसोबत अंकिताच्या या फोटोशूटमधील प्रत्येक पोझ लक्षवेधी ठरत आहे.
साधा मेकअप, बांधलेले केस, गुलाबाची फुलं आणि पारंपरिक दागिन्यांमुळे तिचा हा मराठमोळा लूक अधिकच उठून दिसत आहे.
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सक्रिय असून, ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि खास लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.
'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अंकिताच्या 'व्हाईट अँड रेड' थीममधील मराठमोळ्या लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. | (सर्व छायाचित्र : Instagram)