अंशुला कपूरच्या रिसेप्शन लूकची चर्चा; बनारसी साडीला दिला मॉडर्न ट्विस्ट, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

लग्नानंतरचा पहिला लूक : रोहन ठक्करसोबत लग्न झाल्यानंतर अंशुला कपूर कॉकटेल रिसेप्शनमध्ये शोभून दिसली. तिचा लग्नानंतरचा पहिला लूक चर्चेत आला आहे. | (Photos- Instagram)
लाल रंगाची खास निवड : लग्नानंतरच्या पहिल्या लूकसाठी तिने लाल रंगाचा आउटफिट निवडत नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात साजरी केली.
बनारसी साडीचे आधुनिक रूप : डिझायनर अमित अग्रवाल यांनी जुन्या बनारसी ब्रोकेड साडीचे आकर्षक कॉर्सेट-स्टाइल गाऊनमध्ये रूपांतर केले.
परंपरा आणि फॅशनचा मिलाफ : पारंपरिक विणकाम जपत आधुनिक डिझाइनचा सुंदर संगम या आउटफिटमध्ये पाहायला मिळाला.
दागिन्यांनी वाढवली शान : कुंदन, मोती आणि पाचू जडवलेल्या दागिन्यांनी अंशुलाच्या रॉयल लूकमध्ये अधिक भर घातली.
मिनिमल मेकअपने खुलले सौंदर्य : नैसर्गिक ग्लो, हलका मेकअप आणि स्लीक बन हेअरस्टाइलमुळे तिचा लूक अधिक एलिगंट दिसला.
लाल रंगामागची खास भावना : "विवाहित आयुष्यातील पहिल्या लूकसाठी लाल रंगच योग्य वाटला," असे अंशुलाने सोशल मीडियावर सांगितले.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव : अंशुलाचा पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेला हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला.