ऐन तिशीतच चेहऱ्यावर सुरकुत्या? खा 'हे' पदार्थ, दिसाल तरुण
Krantee V. Kale
वयानुसार त्वचेत बदल होतात आणि सुरकुत्या येतात ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. | All Photos- yandex
योग्य आहारामुळे त्वचा निरोगी आणि तरुण राहते. म्हणून कोणते पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, जाणून घ्या.
व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेले बदाम त्वचेला योग्य पोषण देण्यास देते. म्हणून दररोज बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचेचे वृद्धत्व रोखण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन ए, ई आणि के ने समृद्ध पालक त्वचेला हायड्रेट करतात. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. म्हणून दररोजच्या आहारात पालकचा समावेश करा.
अक्रोड हे ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध आहे. अक्रोड चेहऱ्यावरील जळजळ आणि डाग कमी करण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे घटक असते. जे त्वचेचे रक्षण करते. तसेच चेहरा चमकदार करण्यास मदत करते.
त्वचेचे वृद्धत्व रोखण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवा. तसेच बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन वापरा.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)