मंगळागौरीसाठी अनुष्का सरकटेचा मराठमोळा साज; पोपटी नऊवारीत खुललं सौंदर्य
किशोरी घायवट-उबाळे
पोपटी रंगाच्या नऊवारीत अनुष्का सरकटेचा पारंपरिक लूक खुलून दिसत आहे.
नऊवारीच्या नाजूक सिल्व्हर बॉर्डरने तिच्या लूकला शाही टच दिला आहे.
पारंपरिक नथ, नेकलेस आणि झुमक्यांनी अनुष्काचा मराठमोळा साज उठून दिसतोय.
हातभर हिरव्या बांगड्यांनी तिच्या नऊवारी लूकमध्ये रंगांची सुंदर जुगलबंदी साधली आहे.
कपाळावरील छोटासा टिकलीचा साज आणि खुललेलं हास्य तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
साध्या पण मोहक मेकअपने अनुष्काने पारंपरिक लूकला मॉडर्न टच दिला आहे.
मंगळागौरीच्या उत्साहात सजलेली अनुष्का तिच्या या मराठमोळ्या अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.