मराठी मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अनुष्का सरकटे सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
| सर्व छायाचित्रे : इंस्टाग्राम (अनुष्का सरकटे)
अलिकडेच तिने वाराणसीत गंगेच्या काठावरील काढलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नौकेतील फेरफटक्यादरम्यान टिपलेला अनुष्काचा साधा आणि शांत अंदाज अनेकांना भावताना दिसतोय.
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी ड्रेस परिधान केला असून त्यावर असलेली गुलाबी नक्षी तिच्या पेहेरवाला उठाव देत आहे.
ड्रेसवरील हलकी गुलाबी एम्ब्रॉयडरी संपूर्ण पेहरावाला पारंपरिक पण सॉफ्ट लूक देताना दिसते.
कानातले झुमके आणि हातातील लाल काचेच्या बांगड्या तिच्या अंदाजात पारंपरिक रंग भरत आहेत.
मोकळे ठेवलेले केस, कपाळावरची छोटी टिकली आणि चेहऱ्यावरचं साधं हास्य तिच्या व्यक्तिमत्त्वात सहजता दाखवतं.
फोटोt मागे दिसणारा गंगेचा घाट आणि समोर अनुष्काचा सोज्वळ अंदाज, यामुळे हे फोटो चाहत्यांना विशेष भावले आहेत.
याच कारणामुळे या फोटोंवर लाईक्स आणि प्रतिक्रियांचा ओघ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.