'घाटी' चित्रपटातील अनुष्का शेट्टीचे 'रौद्र' रूप चर्चेत

नेहा जाधव - तांबे

दक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तेही एका नव्या आणि रौद्र भूमिकेतून. | (फोटो सौ. X)
११ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘घाटी’ या आगामी चित्रपटातील तिचा लुक सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजत आहे. | (फोटो सौ. X)
बाहुबलीमधील योद्धा राजकुमारीनंतर अनुष्का पुन्हा एकदा ताकदीच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच तिचा ‘घाटी’ लुक अधिकृतपणे प्रदर्शित झाला असून, त्यात तिच्या चेहऱ्यावरची माती, जखमा, डोळ्यांतील रौद्रता आणि प्रखर भावमुद्रा विशेष लक्ष वेधून घेत आहे. | (फोटो सौ. X)
‘घाटी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष जगर्लामुडी यांनी केले असून, यामध्ये विक्रम प्रभू, राम्या कृष्णन, जगपती बाबू यांसारखे अनुभवी कलाकार तिच्यासोबत झळकणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी – अशा पाच भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. | (फोटो सौ. X)
या चित्रपटातून अनुष्का केवळ एक अभिनेत्री म्हणून नव्हे, तर क्रांती आणि बंडखोरीचे प्रतीक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिच्या अभिनयातील ताकद, लूकमधील नैसर्गिकता आणि कथानकातील सखोलता यामुळे ‘घाटी’बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.