राम मंदिराच्या दर्शनाला जाताय? तर 'हे' खास स्ट्रीट फूड खायला विसरू नका

Swapnil S

अयोध्या नगरी ही केवळ राम मंदिरासाठी प्रसिद्ध नाही तर येथील खाद्यपदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. एकदा जर तुम्ही येथील खाद्यपदार्थांची चव चाखली तर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही. मग, ते चाट असो किंवा जिलेबी. अयोध्येत आल्यानंतर, येथील खास मसाल्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याशिवाय अयोध्येचा प्रवास हा पूर्ण मानला जात नाही. त्यामुळे, आज आपण अयोध्येतील खास स्ट्रीट फूड्सबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे गेल्यावर हे स्ट्रीट फूड्स खायला विसरू नका.
दाल कचोरी :- दाल कचोरी आणि पूरी हा अयोध्येतील लोकांचा सकाळचा आवडता नाश्ता आहे. या दाल कचोरीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असतो. अयोध्येमध्ये मूग आणि उडीद डाळ यांच्यापासून बनवलेली कचोरी खूप प्रसिद्ध आहे. ही कचोरी चटणी किंवा भाजीसोबत खाल्ली जाते. या कचोरीची चव अतिशय अप्रतिम लागते. ही स्पेशल कचोरी खाल्ल्यानंतर पोट लवकर भरते. मात्र, तुमचे मन लवकर भरत नाही. त्यामुळे, अयोध्येत गेल्यावर या खास दाल कचोरीचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
ज्या लोकांना गोड खायला आवडते. त्यांच्यासाठी अयोध्येमध्ये गोड पदार्थांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. साखरेच्या पाकात बुडवलेली जिलेबी असो किंवा तोंडात विरघळणारे मऊ लाडू असो. येथे तुम्हाला मिठाईंचे भन्नाट ऑप्शन्स मिळतील.
अयोध्येत गेल्यावर येथील दही भल्ले खायला अजिबात विसरू नका. या दही भल्ल्यांची चव इतकी अप्रतिम आहे की, तुम्ही या दही भल्ल्यांची चव विसरूच शकणार नाही. हे दही भल्ले डाळींपासून बनवले जातात.
चाट :- उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये चाट विशेष लोकप्रिय आहे. या राज्यातील विविध शहरांमध्ये चाटचे विविध प्रकार पहायला आणि चाखायला मिळतात. अयोध्येतील चाटची देखील खासियत आहे. ही खासियत म्हणजे अयोध्येमध्ये मिळणाऱ्या चाटसोबत गोड-आंबट चटणी, मसालेदार चणे, कोथिंबीर आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळे, चाटची चव देखील वाढते.