Asha Bhosle : स्वर हरपला… पण वारसा अमर! गिनीज रेकॉर्डने जग जिंकणाऱ्या आशा ताईंची अफाट कारकीर्द जाणून घ्या
Mayuri Gawade
आज भारतीय संगीतविश्वाचा एक सुवर्ण अध्याय संपला… पिढ्यानपिढ्या मनात घर करणारा आवाज असलेल्या आशा भोसले यांचे वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या अफाट संगीतप्रवासातील एक महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड - २०११ मध्ये त्यांनी संगीताच्या इतिहासातील सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या गायिका म्हणून हा मान पटकावला. या अनोख्या यशामागची कहाणी जाणून घ्या…
२०११ मध्ये आशा भोसले यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवत इतिहास रचला. संगीत क्षेत्रातील सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या गायिका म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
७० वर्षांहून अधिक कारकिर्दीत त्यांनी ११,००० पेक्षा जास्त गाणी गायली, हा आकडा त्यांच्या अपार मेहनतीचं प्रतीक ठरतो.
१९४० च्या दशकात सुरू झालेला त्यांचा प्रवास हिंदी, मराठीसह २० हून अधिक भाषांपर्यंत पोहोचला.
२०११ मध्ये लंडनमध्ये झालेल्या एशियन अवॉर्ड्समध्ये त्यांना गिनीज सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलं.
त्यांच्या आवाजाने बॉलिवूड, गझल, पॉप, डिस्को अशा विविध शैलींना नवं रूप दिलं. त्यामुळेच त्यांना ‘वर्सटाइल सिंगर’ म्हणून ओळख मिळाली.
दरवर्षी सरासरी १५० ते १७० गाणी रेकॉर्ड करणं, हीच त्यांची सातत्याची खरी ओळख होती.
गिनीज रेकॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी नम्रपणे म्हटलं, “आज मला जगभर ओळख मिळाल्याची जाणीव होते.”
त्यांच्या हजारो गाण्यांनी केवळ संगीत नव्हे, तर भावनांचाही इतिहास लिहिला. एकाच आवाजात प्रेम, वेदना आणि उत्साह व्यक्त झाला.
आजही आशा भोसले यांचा गिनीज रेकॉर्ड अबाधित आहे, तो त्यांच्या अथक परिश्रमांचा जिवंत पुरावा आहे.
आवाज थांबला असला, तरी आशा भोसले यांची गाणी आणि त्यांची परंपरा कायमच जिवंत राहणार… | सर्व छायाचित्र : सोशल मीडिया (X & Instagram)