सावध व्हा! ATM मधून पैसे काढताना फक्त PIN लपवणं पुरेसं नाही; 'या' ५ गोष्टीही तपासा

Mayuri Gawade

एटीएममधून पैसे काढणे सोपे असले तरी कार्ड स्किमिंग, छुपे कॅमेरे आणि बनावट डिव्हाइसमुळे आर्थिक फसवणुकीचा धोका असु शकतो. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी एटीएमची नीट तपासणी करा.
एटीएममध्ये कार्ड घालण्यापूर्वी कार्ड स्लॉट हलवून पाहा. स्लॉट सैल वाटत असेल किंवा त्यावर वेगळा प्लास्टिकचा भाग बसवलेला दिसत असेल, तर त्या एटीएममध्ये कार्ड वापरू नका.
एटीएमचा पिन टाकताना कीपॅडच्या आसपास आणि वरच्या भागाकडे लक्ष द्या. छुपा कॅमेरा असल्याची शंका वाटल्यास व्यवहार टाळा आणि पिन टाकताना दुसऱ्या हाताने कीपॅड पूर्णपणे झाका.
कीपॅड नेहमीपेक्षा जाड, वेगळे किंवा बटणे दाबताना असामान्य वाटत असतील, तर सावध व्हा. बनावट कीपॅड बसवलेले असण्याची शक्यता असल्याने त्वरित व्यवहार रद्द करा.
पैसे बाहेर येण्याच्या 'कॅश शटर'चीही तपासणी करा. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पैसे बाहेर आले नाहीत, तर एटीएम सोडण्यापूर्वी बॅंकेशी संपर्क साधा.
एटीएममधून पैसे काढल्यानंतर व्यवहार पूर्णपणे बंद झाला आहे का ते तपासा. स्क्रीनवर पुन्हा वेलकम स्क्रीन आल्यानंतरच एटीएममधून बाहेर पडा.
व्यवहार पूर्ण केल्यानंतर कीपॅडवरील 'कॅन्सल' किंवा 'क्लिअर' बटण दोनदा दाबण्याची सवय लावा. यामुळे मागील व्यवहाराची माहिती स्क्रीनवर राहण्याचा धोका कमी होतो.
बॅंक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रीय ठेवा आणि एसएसएल अलर्टकडे लक्ष द्या खात्यातून अनोळखी रक्कम डेबीट झाल्यास तात्काळ बॅंकेशी संपर्क साधता येईल.
शक्यतो ईएमव्ही चिप आणि पिन आधारित कार्डांचा वापर करा आणि निर्जन किंवा सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएमऐवजी सुरक्षित ठिकाणी असलेल्या एटीएमला प्राधान्य द्या. | All Photos : AI Generated