चुकीच्या वेळेत जेवताय? आयुर्वेदानुसार नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण करण्याची योग्य वेळ जाणून घ्या

Mayuri Gawade

चांगल्या आरोग्यासाठी फक्त काय खाता हेच नाही, तर कधी खाता हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
आयुर्वेदानुसार उठल्यानंतर २ तासांच्या आत नाश्ता करा. सकाळी ७ ते ८ ही वेळ उत्तम मानली जाते.
सकाळी ११ नंतर नाश्ता करणं टाळा. उशिरा खाल्ल्याने शरीराचं नैसर्गिक वेळापत्रक बिघडू शकतं.
नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये किमान ४ तासांचं अंतर ठेवा.
दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण केल्यास पचनशक्ती अधिक सक्रिय असल्याचं आयुर्वेद सांगतो.
दुपारी ३ नंतर जेवण करणं टाळा. उशिरा जेवल्याने पचनावर परिणाम होऊ शकतो.
रात्रीचं जेवण शक्यतो संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पूर्ण करा.
रात्री १० नंतर खाणं टाळा. त्यामुळे पचन सुधारण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत होऊ शकते.
वारंवार काहीतरी खाण्याऐवजी आधीचं अन्न पचल्यावरच पुढचं जेवण करा. हा आयुर्वेदाचा महत्त्वाचा सल्ला आहे. | All Photo : Ai Generated