रिकाम्या पोटी लवंग चावल्याने मिळतात ‘एक सो एक’ कमाल फायदे

Mayuri Gawade

आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी दोन लवंगा चावल्याने शरीरातील अनेक तक्रारी दूर होतात. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
लवंग पचनसंस्था मजबूत करून गॅस, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठता यापासून आराम देते.
यकृत सक्रिय ठेवून पोट स्वच्छ करण्यात लवंग मदत करते.
लवंग चावल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.
त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
लवंगातील दाहक-विरोधी गुणधर्म सांधेदुखी आणि सूज कमी करण्यात उपयोगी ठरतात.
त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील मुक्त रॅडिकल्स नष्ट करून कर्करोगाचा धोका कमी करतात.
लवंगाचे सेवन सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि नाक बंद होणे यावरही उपयुक्त ठरते.
त्याचे अँटीव्हायरल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
त्यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन लवंगा चावणे हे एक सोपे पण प्रभावी घरगुती औषध आहे.