लहान मुलांना दूध पचत नाही? जाणून घ्या 'या' गंभीर समस्या..

Swapnil S

अनेकवेळा दूध पचत नसल्याने लहान मुलांना आजरी पडून, अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी नाक वाहने, डोळ्यामध्ये पाणी येणे, डोके दुखणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते... सर्वच आईवडील आपल्या लहान मुलांच्या चांगल्या प्रकृतीसाठी मुलांना दूध पिण्यासाठी सक्ती करत असतात. परंतु दूध पिल्यानंतर ते पचत नाही, व लहान मूल आजारी पडतात. लहान मुले दूध पिण्यास टाळाटाळ करतात..तेव्हा तुम्हालाही वाटते की ते मुद्दाम करत असतील? तर थांबा... | फोटो साैजन्य : FREEPIK
मुलांच्या एकूण आरोग्याच्या बाबतीत आतडे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते जे लहान आतड्यात तयार होते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार होत नसेल तेव्हा दूध पचत नाही. | फोटो साैजन्य : FREEPIK
दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते, जी शरीर शोषून घेते व त्याचे ग्लूकोजमध्ये रुपांतर करते व शरीराला ताकद मिळते. या प्रकारची शर्करा केवळ दुधामध्येच आढळते. | फोटो साैजन्य : FREEPIK
लॅक्टोज् इनटॉलरन्सची लक्षणे ही लॅक्टोज-युक्त पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा पेये पिल्यानंतर काही तासांत दिसून येतात. ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे आणि ती, वयानुसार बदलणारी किंवा संसर्गजन्य आजारांमुळे लहान आतड्याला झालेल्या नुकसानामुळे होऊ शकते. | rawpixel.com / Chanikarn Thongsupa
इतर लक्षणे डोळ्यांमध्ये पाणी येणं, नाक वाहणं, डोकेदुखी होणं, गिळताना त्रास होणं,अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी, पोटाच्या समस्यांचा सामना करणे असू शकतात | फोटो साैजन्य : FREEPIK
जर यांसारख्या समस्या तुमच्या मुलांना जाणवत असतील तर याकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य तो उपचार करा | फोटो साैजन्य : FREEPIK
अश्याप्रकराची कोणतेही लक्षणे आढळल्यास प्रथामिक जबाबदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आपल्या मुलांना देऊ नका. आणि आपल्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दाव करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. ) | फोटो साैजन्य : FREEPIK