बाळांच्या नाजूक त्वचेसाठी स्किनकेअर रूटीन का गरजेचं?

नेहा जाधव - तांबे

नवजात बाळाची काळजी घेणं हे फक्त योग्य आहारापुरतं मर्यादित नसतं, तर त्याच्या नाजूक त्वचेचं संरक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. | (सर्व छायाचित्र - Canva)
बाळांची त्वचा प्रौढांपेक्षा अधिक पातळ, संवेदनशील असते. त्यामुळे योग्य स्किनकेअर रूटीन नसेल तर कोरडेपणा, पुरळ, ॲलर्जी अशा समस्या वाढू शकतात.
दिवसातून एकदा कोमट पाण्याने किंवा सौम्य क्लींजरने आंघोळ. चेहरा आणि डायपर भागाची स्वच्छता दररोज गरजेची.
आंघोळीनंतर बेबी लोशन किंवा तेलाने हलका मसाज, जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहील.
सहा महिन्यांखालील बाळांना थेट उन्हात नेऊ नका. मोठ्या बाळांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सनस्क्रीन लावा.
दर ३-४ तासांनी डायपर बदलावा. सौम्य वाइप्स वापरावेत आणि डायपर रॅशपासून वाचवण्यासाठी क्रीम लावावं.
हलक्या हाताने मसाज केल्याने त्वचेचं आरोग्य सुधारतं, स्नायू बळकट होतात आणि झोप चांगली लागते.
फक्त पाण्याने आंघोळ करून बाळाच्या त्वचेचं आरोग्य राखता येत नाही. सोप्या पण प्रभावी स्किनकेअर रूटीन बाळाच्या त्वचेला निरोगी ठेवतं आणि संसर्ग-ऍलर्जीपासूनही वाचवतं.