पाठदुखीची समस्या सोडत नाही? 'या' गोष्टी करा आणि चुटकीसरशी दुखणं गायब करा

Swapnil S

पाठीचा कणा ताठ ठेवा :- चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहतो. वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे. तसेच कार्यालयात काही वेळानंतर फेरी मारत पुन्हा कामाला सुरुवात केली पाहिजे. | PM
. व्यायाम करताना वाकने टाळावे :- अनेक लोक पाठीचे दुखणे जाण्यासाठी तसेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतात. परंतु ज्याना पाठीचे दुखणे आहे अशा लोकांनी काही व्यायाम टाळायला हवे, वाकून व्यायाम करणे तुमची पाठदुखी अजूनच वाढवू शकते. त्यामुळे असे व्यायाम न केलेले बरे असतात. | PM
सलग काम करु नका काहींना कामाचा इतका ताण असतो की, त्यामुळे ते संपूर्ण वेळ फक्त कामच करीत असतात. काही क्षणाचीही उसंत घेत नाही. त्यामुळे सतत बसून असल्यामुळे पाठीचे दुखणे लागू शकते. त्यामुळे कामात काही वेळाची विश्रांती आवश्‍यक असते. कामांत किमान एक तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नसाल तर तुमच्या ऑफिसमध्येच एक फेरी मारा व पुन्हा कामाला लागा. | PM
जड वस्तू उचलू नका कोणतीही जड वस्तू उचलू नका. जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर आधी गुडघे वाकवून मग ती वस्तू उचलावी. असे केल्याने सर्व भार कंबरेवर जाण्याऐवजी गुडघ्यावर येईल, तसेच अवजड कामे करताना कुणाचीतरी मदत नक्की घ्या, यातून सर्वच भार तुमच्यावर येणार नाही. | PM
सकस आहाराचा समावेश करा पाठदुखीसह अन्य दुखणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात सकस आहाराचा समावशे करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यातून आपली हाडे मजबूत होत असतात. | PM