अंबाडा, गजरा अन् नऊवारीचा साज; 'बाई तुझा आशीर्वाद' मालिकेतील नमिताच्या फोटोशूटची चर्चा

किशोरी घायवट-उबाळे

स्टार प्रवाहवरील 'बाई तुझा आशीर्वाद' मालिकेत नमिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सध्या चर्चेत आहे.
शुभांगीने नुकतेच जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जांभळ्या नऊवारीला सुंदर पारंपरिक डिझाइनची खास किनार आहे.
या साडीसोबत तिने जांभळ्या रंगाचा आकर्षक ब्लाउज परिधान केला आहे.
केसांचा छान अंबाडा आणि त्यावर माळलेला पांढरा गजरा तिच्या लूकमध्ये भर घालत आहे.
कानातील पारंपरिक झुमकेही तिच्या लूकला उठावदार बनवत आहेत.
नाकातील नथ आणि कपाळावरील छोटीशी टिकली तिच्या मराठमोळ्या रूपाला चार चाँद लावत आहे.
गळ्यातील मोत्यांचा पारंपरिक हार तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
हातातील हिरवा चुडा आणि त्यासोबतच्या बांगड्या लक्षवेधी ठरत आहेत.
हातावरील सुंदर मेहंदीमुळे तिच्या पारंपरिक लूकला आणखी खास टच मिळाला आहे.
शुभांगीचा हा नऊवारीतील देखणा अंदाज सण-समारंभासाठी पारंपरिक लूकची प्रेरणा देणारा आहे.