उपाशीपोटी केळी खाता? तुमच्यासाठी ही सवय योग्य आहे का? जाणून घ्या
Mayuri Gawade
सकाळी वेळ कमी असल्यामुळे अनेकजण नाश्ता न करता एक-दोन केळी खाऊन दिवसाची सुरुवात करतात; मात्र केळी कधी आणि कशी खाता, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
केळीमध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम असल्यामुळे ते शरीराला झटपट ऊर्जा देणारे फळ मानले जाते.
सकाळी वर्कआऊट करणाऱ्यांसाठी किंवा घाईने ऑफिसला निघणाऱ्यांसाठी केळी झटपट एनर्जी देणारा पर्याय ठरू शकतो.
निरोगी व्यक्ती योग्य प्रमाणात केळी खाऊ शकते; मात्र केळीमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स कमी असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर लवकर भूक लागू शकते.
केळी एकट्याने खाण्याऐवजी दही, बदाम, शेंगदाणे किंवा ओट्ससोबत खाल्ल्यास आहार अधिक संतुलित होण्यास मदत होऊ शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यानंतर काहींना गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे अशा व्यक्तींनी केळी नाश्त्यानंतर खाण्याचा पर्याय निवडावा.
केळी दही, पीनट बटर, ड्रायफ्रुट्स किंवा स्मूदीसोबत खाल्ल्यास त्यातून फायबर आणि हेल्दी फॅट्स मिळू शकतात, ज्यामुळे पोट अधिक वेळ भरलेले राहण्यास मदत होते.
खूप पिकलेले केळे खाताना प्रमाणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे आणि फक्त केळीवर अवलंबून न राहता नाश्त्यात प्रोटीन आणि फायबरचा समावेश करावा.
डायबिटीस किंवा पचनाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी केळी किती आणि कधी खावे याबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. | All Photos : AI Generated