केळी खाऊन साल फेकताय? सालीचे फायदे वाचून व्हाल थक्क; त्वचा अन् केसांसाठी ठरेल उपयुक्त

Krantee V. Kale

फळे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. ती पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात.
परंतु, काही फळांची साले देखील शरीरासाठी फायदेशीर मानली जातात. जसे की, केळीची साल.
तुम्हीही केळी खाऊन केळीची साल फेकून देताय तर थांबा. केळीच्या सालीचे हे भन्नाट फायदे जाणून घ्या.
केळीच्या सालीमध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फिनॉलिक्स, फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्स सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
पिवळ्या दातांसाठी केळीची साल जास्त फायदेशीर आहे. केळीची साल दातांवर घासल्याने दातांवरील पिवळेपणा निघून जातो.
केळीच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्त्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे केळीच्या साली वापरल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
केळीच्या सालीमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि पॉलीफेनॉलसारखे बायोअॅक्टिव्ह घटक असतात. म्हणून, पोटदुखीने त्रस्त असलेल्यांसाठी केळीची साल गुणकारी ठरू शकते.
केळीची साल केसांना लावल्याने केस निरोगी आणि चमकदार बनतात.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)