केळी खाऊन साल फेकू नका! 'असा' तयार करा फेसमास्क, त्वचा दिसेल अधिक टाईट आणि ग्लोइंग
Mayuri Gawade
केळी हे स्वस्त आणि सहज उपलब्ध फळ असून, त्यातून शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते.
केळीप्रमाणेच त्याच्या सालीचाही वापर घरगुती स्किनकेअरमध्ये केला जातो आणि त्यातील काही घटक त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतात.
फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम केळीचे साल स्वच्छ धुऊन त्याच्या बारीक फोडी करून घ्या.
केळीच्या सालीच्या फोडी एका पातेल्यात घेऊन त्यात थोडं पाणी आणि एक चमचा तांदूळ घाला.
हे मिश्रण गॅसवर ठेवून साधारण ८ ते १० मिनिटे उकळवा, जेणेकरून केळीची साल आणि तांदूळ मऊ होतील.
मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्यात कॉर्न स्टार्च मिसळा.
तयार झालेला लेप चेहऱ्यावर समान प्रमाणात लावून साधारण १५ मिनिटे तसाच राहू द्या.
१५ मिनिटांनंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून हा लेप स्वच्छ पाण्याने धुऊन काढा.
या घरगुती फेसमास्कमुळे त्वचा तात्पुरती अधिक गुळगुळीत आणि टाईट दिसण्यास मदत होऊ शकते; मात्र संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल.
| All Photos : AI Generated