बेली फॅट कमी करायचंय? रोज 'या' ५ सवयी सुरू करा आणि फरक पाहा!
Mayuri Gawade
जर तुमचं वजन झपाट्याने वाढत असेल, तर आत्तापासूनच आहारात बदल करणं गरजेचं आहे.
डायेटिंग करण्यापेक्षा रोजच्या छोट्या सवयी बदलल्यास वजन कमी करणं सोपं होतं.
दिवसाची सुरुवात नेहमी कोमट पाणी पिऊन केल्यास पचनक्रिया सुधारते.
रात्री जिरे आणि धने पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिल्यास चयापचय क्रिया वाढते.
या सवयींमुळे शरीरात साचलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
जेवणानंतर बडीशेपसोबत ओवा आणि काळं मीठ खाल्ल्यास पचन अधिक चांगलं होतं.
जेवण सुरू करण्यापूर्वी सलाड किंवा कडधान्य खाल्ल्यास भूक नियंत्रित राहते.
फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रणात राहतं.
या सवयी नियमित पाळल्यास साखरेची इच्छा कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.