सुटलेलं पोट कमी करायचंय? डॉक्टरांनी सांगितला सोपा फॉर्म्युला

Mayuri Gawade

सुटलेलं पोट आणि वाढलेला कंबरेचा घेर कमी करायचा असेल, तर डॉ. चेतना यांनी getfitwith_drchetana या इन्स्टाग्राम पेजवर सांगितलेले हे सोपे उपाय उपयोगी ठरू शकतात.
सकाळचा नाश्ता शक्यतो ९ वाजण्यापूर्वी करा. दिवसाची सुरुवात योग्य आहाराने केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या. डाळी, कडधान्ये आणि प्रोटीनने भरपूर पदार्थ अधिक फायदेशीर ठरतात.
रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
रात्रीच्या जेवणात हलके आणि सहज पचणारे पदार्थ खा. तेलकट व मसालेदार पदार्थ टाळणे फायदेशीर ठरू शकते.
जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. जेवण आणि झोप यामध्ये किमान २ तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.
दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडावेळ चालण्याची सवय लावा. यामुळे अन्नपचनास मदत होते.
शक्य असल्यास उकिडवे बसून काही कामे करा किंवा मलासनासारख्या योगासनाचा सराव करा.
मैद्याचे पदार्थ, साखर, बेकरी पदार्थ, प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड कमी केल्यास पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. | Photos : Ai Generated