दररोज जांभूळ खायचे फायदे आणि नुकसान

Suraj Sakunde

उन्हाळा संपून सर्वत्र पावसाचं आगमन झालं आहे. यासोबतच जांभळाचा सिझन सुरु झाला आहे.

जांभूळ खायला जितकं चविष्ट असतं, तितकंच ते लाभदायी असतं. परंतु त्याचवेळी त्याचे काही तोटेही असतात. आज आपण जांभळाचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया.

जांभळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, विटामिन्स इत्यादी पोषकतत्त्वे आढळतात. त्याच्या नियमित सेवनामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते.

जांभूळ लोहाचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. त्यामुळं त्याच्या नियमित सेवनामुळं शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि अॅनिमियाच्या समस्येपासून सुटका होते.

जांभळामध्ये डायटरी फायबर्स आढळतात, त्यामुळं पचनसंस्था सुधारते. याशिवाय कफ आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

आरोग्यतज्ञांच्या मते, जांभूळ डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं. जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, जांभळात आढळणाऱ्या जम्बोलिन या घटकामुळं जम्बोलिन रक्त शर्करा नियंत्रित राहते.

हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जांभूळ फायदेशीर मानलं जातं. त्याच्या नियमित सेवनामुळं शरीर डिटॉक्सिफाय होते. जांभळामधील काही तत्त्वांमुळं ओरल हेल्थ दुरुस्त करण्यामध्ये मदत होते.

जांभळाचं सेवन करण्यामुळं काही नुकसानही होऊ शकते. जास्त प्रमाणात जांभूळ खाल्ल्यामुळं त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

जांभळाच्या जास्त सेवनामुळं उलटी किंवा जुलाबाची समस्या होऊ शकते. सोबतच ब्लड शुगरचीही समस्या होऊ शकते. सोबतच ब्लड शुगर पातळी अस्थिर होऊ शकते. त्यामुळं जांभळं खाताना ती प्रमाणात खायला हवी.