खजूर खाण्याचे 'हे‘ फायदे जाणून घ्या!

Swapnil S

दररोज एक मूठभर खजूर (dates) खाल्ल्यास आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या दूर होतील. खजुरामध्ये अनेक पोषक तत्वं असतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि लोह मुबलक प्रमाणात असते.
खजुरामध्ये पुरेशा प्रमाणात डाएटरी फायबर असते. त्यामुळे एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. आहारातील फायबर रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्ऱॉल शोषून घेते. या कारणामुळे खजुराचे सेवन करणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. | PM
मासिक पाळीच्या वेदना कमी होतात – महिलांनी खजूर जरूर खावा. अनेक अभ्यासांतून असे समोर आले आहे की, खजूरात असलेल्या तत्वांमुळे मासिक पाळीच्या समस्य दूर होतात तसेच ती नियमित येते. खजूर खाल्याने मासिक पाळीच्या वेदनाही कमी होतात. | PM
पचनासाठी मदतशीर – खजूरमध्ये असलेल्या उच्च विद्राव्य फायबरमुळे, तो पचनासाठी उत्तम ठरतो. खजूराचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता, अतिसार आणि पाचन तंत्राचा दाह किंवा सूज रोखली जाऊ शकते. | PM
रक्तदाब नियंत्रणात राहतो – खजुरात असलेले पोटॅशिअम, हे शरीरातून सोडिअम काढून टाकण्यास मदत करते. अशा प्रकारे पोटॅशिअम शरीरातील सोडियम काढून रक्तदाब नियंत्रित करते. यामुळे हृदयाचे ठोके संतुलित राहतात. | PM