पावसाळ्यात आंबे खाल्ल्यानं होतात 'हे' ७ फायदे

Suraj Sakunde

आंबा फळांचा राजा म्हटलं जातं. आंबा खायला जितकी मजा येते, तितकाच तो शरीरासाठीही फायदेशीर असतो.

पावसाळ्यामध्ये आंबे खाल्ल्यानं शरीराला काय फायदे होतात, हे आपण जाणून घेऊया.

आंब्यामध्ये विटामिन-ए, विटामिन-सी, विटामिन-ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर इत्यादी तत्त्वे आढळतात. त्यामुळं शरीर सुदृढ ठेवण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार, आंब्यामध्ये शरीराला थंड ठेवण्याचे गुण आढळतात. आंब्यात आढळणाऱ्या एन्जाइम्स कार्बोहायड्रेट आणि दुसऱ्या पदार्थांना पचवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

आंब्यातील फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करून हृदयाचं स्वास्थ राखण्यासाठी लाभदायी मानले जाते. आरोग्यतज्ञांच्या मते दररोज आंब्याच्या सेवनामुळं हार्ट स्ट्रोकचा धोका कमी होतो.

आंब्यामध्ये विटामिन-ए विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळं डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदे होतात. जर तुम्ही रोज आंब्याचं सेवन केल्यानं डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो.

आंब्यामध्ये विटामिन-सी विपुल प्रमाणात असतं. त्यामुळं दररोज याच्या सेवनानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. आंब्यामुळं पावसाळ्यात होणाऱ्या ताप, खोकला, सर्दी इत्यादी समस्यांपासून आराम मिळू शकतो.

आंबा चवीला गोड असतो. त्यामुळं अनेकांना वाटतं की आंब्याच्या सेवनामुळं वजन वाढू शकतं. परंतु असं नाही. आंब्यामध्ये आढळणाऱ्या फायबरमध्ये कमी कॅलरी असतात. त्यामुळं जास्त वेळ पोट भरलेलं राहतं. त्यामुळं ओव्हर डायटिंगपासून वाचू शकता.

आंब्यामध्ये विटामिन बी विपुल प्रमाणात आढळतं. जे सेरोटोनिन आणि डोपामाईनसारख्या न्यूरोट्रान्समिटर्सचं उत्पादन वाढवण्यात साहाय्यक ठरतं. हे दोन्ही न्यूरोट्रान्समिटर मेंदुला रेग्युलेट करतात आणि मानसिक स्वास्थ चांगलं ठेवण्यात मदत करतात.