हृदय, मेंदू, त्वचा… एका अक्रोडाचे अनेक फायदे, जाणून घ्या
किशोरी घायवट-उबाळे
मेंदूची शक्ती वाढवतो : अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवायला मदत करतात. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
हृदय निरोगी ठेवतो : अक्रोड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदयविकाराचा धोका घटवतो.
वजन नियंत्रणात मदत : फायबर आणि प्रोटीनमुळे पोट लवकर भरते, त्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार राहते आणि केस गळती कमी होते.
डायबेटीस नियंत्रणात ठेवतो : अक्रोड रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवायला मदत करतो.
पचनक्रिया सुधारतो : अक्रोडमधील फायबर बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवतो : व्हिटॅमिन E आणि झिंकसारखे घटक शरीराची इम्युनिटी मजबूत करतात.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)