पावसाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे ७ फायदे

Suraj Sakunde

पावसाळ्यात अनेक लोक आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप हे आजार पावसाळ्यात सामान्य असतात.

या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊया गुळाच्या चहाचे फायदे

दररोज गुळाचा चहा प्यायल्यानं शरीराला अनेक पोषण तत्त्वे मिळतात. गुळाच्या चहात आरोग्यासाठी आवश्यक मिनरल्स, विटामिन्स, अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषण तत्त्वे आढळतात.

आरोग्यतज्ञांच्या मते, दररोज गुळाचा चहा प्यायल्यानं शरीर डिटॉक्सिफाई होतं, सोबतच शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

पोटॅशियमच्या गुणांनी भरपूर गुळाचा चहा दररोज प्यायल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.

श्वासाशी संबंधित समस्या जसे की, खोकला, अस्थमा, सर्दी, ताप इत्यादीपासून आराम मिळवण्यासाठी गुळाचा चहा प्यायला हवा.

गुळाच्या चहामध्ये झिंक आणि सेलेनियमसारखे पोषक तत्त्वे आढळतात, जी शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात.

उलटी, जुलाब आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपल्या आहारात गुळाच्या चहाचा समावेश करू शकता. गुळामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं, त्यापन पचनक्रिया सुधारते.

गुळामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं, ज्यामुळं शरीरातील रक्ताची कमतरता नाहीशी करण्यास मदत होते आणि एनिमियासारख्या गंभीर आजारांपासून वाचण्यास मदत होते.