फक्त दिवाळीपुरतंच नाही… उटणं आहे रोजच्या स्किन केअरचं गुपित

Mayuri Gawade

दिवाळी म्हटलं की अभ्यंगस्नान आणि उटणे लावल्याशिवाय सणच अपुरा वाटतो. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
आयुर्वेदात उटण्याचे महत्त्व हजारो वर्षांपूर्वी सांगितले गेले आहे.
नैसर्गिक घटकांपासून बनलेले हे उटणे केवळ सुगंधच नाही, तर शरीरासाठी औषधी गुणधर्मांनी भरलेले असते.
थंडीत कोरडी पडणारी त्वचा मुलायम करण्यासाठी उटण्यातील चंदन, हळद आणि इतर वनस्पती उपयुक्त ठरतात.
उटणे नियमित लावल्याने त्वचा उजळते आणि नैसर्गिक चमक वाढते.
त्यातील रक्तचंदन, नागरमोथा आणि वेखंड हे घटक त्वचेवर स्क्रबरसारखे काम करतात.
हळदीतील अँटी-एजिंग गुणधर्मांमुळे सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते.
उटण्यात मध किंवा दूध मिसळल्यास त्वचा अधिक मऊ आणि तजेलदार होते.
तसेच, चेहऱ्यावरील किंवा हाता-पायावरील अनावश्यक केसांची वाढ कमी करण्यासाठीही उटणे फायदेशीर ठरते.
त्यामुळे दिवाळीपुरतेच नव्हे, तर थंडीच्या दिवसांत दर आठवड्याला एकदा उटणे लावणे आपल्या स्कीन केअरसाठी उपयुक्त आहे.