हिरव्या बांगड्या आणि सुहासिनीचं नातं काय?

नेहा जाधव - तांबे

हिरव्या बांगड्या हा स्त्रियांचा आवडत शृंगार. सोळा शृंगारापैकी एक हा शृंगार | (Photo - Insta/Pratik_Khadse_photography)
विशेष करून महाराष्ट्रात लग्न झालेल्या स्त्रियाच हिरवा चुडा भरतात. सवाशिनीचं लेणं म्हणून हा हिरवा चुडा भरला जातो. | (Photo - Insta/sampada_pusalkar)
पण, या हिरव्या बांगड्या आणि सुहासिणीचं नेमकं नातं तरी काय असेल बरं? | (Photo - Insta/Ashwini_gawande_Photography)
हिरव्या बांगड्यांचा रंग नवीन घरातील नातेसंबंध प्रेमाने फुलवतो आणि त्यांना भरभराट मिळवून देतो. | (Photo - Insta/Pratik_Khadse_photography)
विवाहित महिलांनी दोन्ही हातात बांगड्या घातल्यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळावे, असा विश्वास आहे. | (Photo - Insta/freezenframe_by_shriram)
वास्तुशास्त्रानुसार, हातामध्ये असलेल्या हिरव्या बांगड्यांच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरातील वातावरण सुखमय आणि समृद्ध होते. | (Photo - Insta/attitude_girl_arti29)
मनगटावर असलेल्या ॲक्यू-प्रेशर पॉइंट्सचे दाबल्याने महिलांचे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. | (Photo - Insta/shbuh_6re)
गर्भवती महिलांनी 7 व्या महिन्यानंतर बांगड्या घालल्याने मेंदूच्या पेशींचा विकास होतो आणि शिशूला आवाजांची ओळख होऊ लागते. | (Photo - Insta/artsvilla_with_amit_ghadi)
बांगड्या घासल्यामुळे मनगटावर सतत घर्षण होते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन शरीराच्या इतर क्रिया सुधारतात. | (Photo - Insta/ artist_sandip_kaur)
तर असे आहे हिरव्या बांगड्या आणि सुहासिनीचे नाते. स्त्रियांच्या आरोग्यात तर हिरव्या बांगड्या भर घालतातच पण त्यातही त्यांचे सौंदर्य उठून दिसते. | (Photo - Insta/swar_ada13)