ऑफिसमध्ये रोज खा 'हे' बजेट-फ्रेंडली हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल एनर्जेटिक

किशोरी घायवट-उबाळे

ऑफिसमध्ये रोज खाण्यासाठी काही हाय-प्रोटीन पदार्थ उपयोगी पडू शकतात. ज्यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहू शकाल. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
भाजलेले हरभरे : भाजलेले हरभरे हे कमी खर्चात मिळणारे प्रोटीन आणि फायबरयुक्त स्नॅक आहेत. ते जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवतात आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये सहज साठवून ठेवता येतात.
उकडलेली अंडी : उकडलेली अंडी प्रोटीन आणि आवश्यक अमिनो ॲसिड्सचा उत्तम स्रोत आहेत. अंडी कमी वेळेत उकडून होतात, सहज डब्यात नेता येतात आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
शेंगदाणे : शेंगदाण्यांमध्ये वनस्पतीजन्य प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. मधल्या वेळच्या भुकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
पनीर : पनीर हा शाकाहारींसाठी प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामध्ये कॅल्शियमही भरपूर असल्याने हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. ऑफिस लंचमध्ये हा उत्तम पर्याय ठरतो.
ग्रीक योगर्ट किंवा दही : ग्रीक योगर्ट किंवा साधे दही हे प्रोटीनसमृद्ध असून पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
त्यात फळे किंवा ड्रायफ्रूट्स घालून खाल्ल्यास ते अधिक पौष्टिक आणि पोटभर वाटणारे स्नॅक बनते.
स्प्राऊट्स सॅलड : मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक असतात. त्यात ताज्या भाज्या आणि हलके मसाले घालून पौष्टिक व चवदार ऑफिस मील तयार करता येते.
महागडे सप्लिमेंट्स नकोत! हे बजेट-फ्रेंडली हाय-प्रोटीन पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट करून कमी खर्चात शरीराला आवश्यक प्रोटीन मिळवता येते.
संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत हे पदार्थ आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरू शकतात.